माणसाची उत्पत्ती डुक्कर आणि चिपांझीच्या संकरातून

मानव जातीची उत्पत्ती माकडांपासून नव्हे तर डुक्कर आणि चिपांझी यांच्या संकरातून झाली असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. जॉर्जिया विद्यापीठातील जेनेसिस्ट युजिन मकार्थी यांनी हा दावा केला असून त्यांचा पशुसंकराचा दांडगा अभ्यास आहे.

मकार्थी सांगतात चिपांझी आणि माणूस यांच्यात कांही फरक नक्कीच आहेत पण त्या दोघांत साम्ये खूप आहेत. माणसात चिपांझी आणि डुक्कर या दोघांचीही लक्षणे आढळतात. माकड आणि माणूस यांच्यातील फरक हा डुकराबरोबरच्या वर्णसंकरामुळे आहे. चिपांझी आणि मानव यांचे जीन्स पुष्कळसे सारखे असले तरी दोघांच्या शारीरिक रचनेत फरक आहेत आणि म्हणूनच माकड आणि माणूस हे वेगळे आहेत. मात्र हा फरक डुकरांच्या माणसातील जीन्समुळे बुजला जातो. माणसाचे कमी केस असलेली त्वचा, त्याखालचे वसा चरबीचे आवरण, हलक्या रंगाचे डोळे, उंच दिसणारे नाक, दाट भुवया हे डुकरांशी मिळतेजुळते आहे. इतकेच नव्हे तर डुकराचे हृदय आणि त्वचा माणसाशी खूपच मिळतीजुळती आहे.

अर्थात चिपांझी आणि डुक्कर यांच्यातील संकर प्रक्रिया दीर्घकाळ सुरू असणार व त्यातूनच नवीन प्रजाती म्हणजे मानव तयार झाला असणार असा त्यांचा दावा असून त्यानंतर बर्यापच कालावधीनंतर हा मानव जननक्षम झाला असावा आणि नंतर माणूस जमात निर्माण झाली असावी असाही मकार्थी यांचा दावा आहे. एकंदर काय तर माणसाचा पूर्वज केवळ माकडच नाही तर डुक्करही आहे म्हणायचे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment