माओवाद्यांकडून भूसुरुंगाचा स्फोट, सात पोलिस ठार

औरंगाबाद(बिहार)- बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात सात पोलिस शहीद झाल्याची घटना मंगळवारी घडली, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक सुशील खोपडे यांनी दिली. हे जवान गस्त घालत असताना ही घटना घडली. नबीनगर-टंडवा मार्गावर गस्त घालणा-या पोलिसांची गाडी या स्फोटात उडवण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक रविंद्र कुमार यांनी दिली.

या स्फोटात ठार झालेल्यामध्ये टंडवा पोलिस ठाण्याचे प्रमुख अजय कुमार आणि अन्य पाच जण ठार झाले. नबीनगर येथील बैठकीहून टंडवा ठाण्याकडे येत असताना हा स्फोट झाला. या स्फोटानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि गृह सचिवांची तातडीची बैठक बोलावली आहे.