त्यांनी नाकारली एक कोटी पगाराची नोकरी

मुंबई – देशातील आघाडीच्या आणि पदवी आधीच नोकरीची हमी देणा-या आयआयटीमधून दरवर्षी पगाराचे नवे नवे विक्राम होत असतानाच दोन विद्यार्थ्यांनी चक्क एक कोटींच्या नोकरीला नकार दिला आहे. आयआयटी कानपूरमधून लवकरच पदवीधर होणा-या दोन तरुणांनी त्यांना प्लेसमेंटमधून मिळालेल्या एक कोटींहून अधिक वेतन असलेल्या ओरॅकलफ या मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरीला नकार दिला आहे.

ओरॅकलफच्या ऐवजी या दोन विद्यार्थ्यांनी मगुगलफ आणि टॉवर रिसर्च कॅपिटलफ या कंपन्यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे या दोघांनाही ओरॅरकल कंपनीत मिळणा-या वेतनापेक्षा कमी वेतन मिळणार आहे. मात्र, केवळ जे काम करण्यास आवडते तेच करणार असल्याचे सांगत या दोघांनीही ओरॅकलमधील नोकरी नाकरली.

गुगलफ आणि टॉवर रिसर्च कॅपिटलफ या कंपन्यांनी त्यांना अनुक्रमे 68.34 लाख आणि 74.55 लाख रुपये इतके वेतनाची ऑफर दिल्याचे प्लेसमेंटविभागातील एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. आयआयटी असो की एमबीए या उच्च शिक्षाणानंतर विद्यार्थी पैशाच्या मागे धावतात असे चित्र असतानाच आयआयटी कानपूरमधील या दोन तरुणींनी वेगळा विचार केला आहे.

Leave a Comment