भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान धोनी हा सर्वाधिक महागडी बॅट वापरणारा पहिला खेळाडू ठरला आहे. अर्थात धोनीच्या बॅटची किंमत अवाजवी नाही मात्र ज्या कंपन्यांच्या बॅटसाठी तो स्पॉन्सरशीप करतो आहे त्या कंपन्यांनी त्याला वर्षाला तब्बल २५ कोटी रूपये देण्याचा करार केल्याने धोनीच्या बॅटची किमत २५ कोटी रूपये मानली जात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या खेळसाहित्य बनविणार्या स्पाईन कंपनीने त्यांच्या बॅट स्पॉन्सर करण्यासाठी धोनीशी करार केला असून ही कंपनी त्याला वर्षाला या करारापोटी १८ ते २० कोटी रूपये देणार आहे. दुसरी कंपनी भारतीय आहे. एमिटी युनिव्हर्सिटी नेही धोनी बरोबर बॅट स्पॉन्सरशीपसाठी करार केला असून ही कंपनी त्याला वर्षाला ६ कोटी रूपये देणार आहे. याचाच अर्थ बॅटसाठी सर्वाधिक पैसे मिळविणारा धोनी हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे.