फेसबुकच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीवर बलात्कार

कल्याण – मुंबईतील सांताक्रुझ येथे राहणार्‍या सलाम नामक तरुणाने फेसबुकवर बोगस फोटो टाकून कल्याणातील एक 20 वर्षीय तरुणीशी मैत्री केली होती. या मैत्रीतूनच पुढे दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यामुळे सलामने या तरुणीकडे लग्नाची मागणी केली होती. मात्र, या तरुणीने त्याची ही मागणी फेटाळून लावली. फेसबुकवरून मैत्रीच्या जाळ्यात अडकलेल्या कल्याणमधील या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

त्यामुळे सोशल नेटवर्किंगमुळे होणार्‍या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. तरुणीच्या नकारानंतर चिडलेल्या सलामने तिच्या कुटुंबीयांना त्रास देण्याची धमकी या तरुणीला दिली. त्यानंतर त्याचे मित्र राधेश्याम आणि रहमत यांनी तिला बांद्रा येथे नेऊन सलामच्या अनुपस्थितीत तिच्याशी खोटा निकाह लावला. यावेळी बनावट कागदपत्रांवर इफरोज आणि वासिम यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षर्‍या केल्या होत्या. तर सलाम हा तिला तोतया नावाने भेटत राहिला.

दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी सलामने तिचे कल्याण येथून अपहरण करून बेकायदा केलेला निकाहनामा दाखवून तोच तिचा पती असल्याचे सांगितले आणि तिला एका खोलीत कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची तक्रार पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात केली आहे. डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2013 या कालावधीत हा प्रकार घडला असून, न्यायालयाच्या आदेशानुसार महात्मा फुले पोलीस ठाण्यात सलाम, राधेश्याम, रहमत काझी, इफरोज खान, वसिम खान, जमाल खान या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment