पप्पू कलानीला जन्मठेपेची शिक्षा

मुंबई: इंदर भटिजा हत्येप्रकरणी दोषी ठरवलेल्या माजी आमदार आणि उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक पप्पू कलानी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कल्याण सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कलानीसोबतच त्यां च्या तीन साथीदारांना ही जन्मयठेपेची शिक्षा सुणावण्यात आली आहे.

सुमारे २३ वर्षापूर्वी भाजप कार्यकर्ते इंदर भटिजा यांच्या हत्येप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी पप्पू कलानी यांच्यासह चौघांना दोषी ठरवले होते. पप्पू कलानी यांच्यासह बच्ची पांडे, बाबा ग्राबियाल, अर्शद ताहीर हुसेन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी या प्रकरणी आरोप सिद्ध झालेल्या चौघांना फाशी देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने मंगळवारी त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल २३ वर्षे जुन्या या खून खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅकवर झाली. इंदर भटिजा हे पप्पू कलानी आरोपी असलेल्या एका खून खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. पोलिस संरक्षण असतानाही त्यांची २७ फेब्रुवारी १९९० रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर सायंकाळी पिंटो पार्क रिसॉर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या घनश्याम भटीजा यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. ही हत्या पप्पू कलानी यांनीच केल्याचा आरोप घनश्याम यांचे बंधू आणि एकमेव प्रत्यक्षदर्शी इंदर भटीजा यांनी करत आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होतं. मात्र २८ एप्रिल १९९० रोजी सकाळी इंदर कामावर जात असताना अंगरक्षकाचीच बंदूक काढून घेत इंदरला गोळ्या घालण्यात आल्या.

Leave a Comment