उध्दव ठाकरे यांच्यापुढील आव्हाने

शिवसेनेतून काल माजी खासदार मोहन रावले हे बाहेर पडले. पक्षाला गळती लागल्याचे हे लक्षण आहे आणि उध्दव ठाकरे तर महाराष्ट्र विधानसभेवर भगवा ङ्गडकवण्याची स्वप्ने बघत आहेत. कोणालाही स्वप्ने बघण्याचा अधिकार असतो. त्यांनी खुशाल स्वप्ने बघावीत पण त्या स्वप्नांच्या पूर्तीच्या आड किती आव्हाने आहेत याचाही जरूर विचार करावा. उध्दव ठाकरे तसा विचार करत नाहीत असे लक्षात येत आहे. म्हणूनच त्यांच्यामुळे आणि त्यांच्याचमुळे पक्षाला लागलेल्या गळतीचा ते गांभिर्याने विचार करत नाहीत. २००४ सालपासून शिवसेनेला गळती लागली आहे. नारायण राणे, राज ठाकरे हे दोन मोठे नेते पक्षातून बाहेर पडले. याशिवाय अनेक आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख हे एक एक करीत बाहेर पडत गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी उध्दव ठाकरे यांना उद्याचा शिवसेनाप्रमुख म्हणून पुढे करायला सुरूवात केली तेव्हाच काही लोक बाहेर पडले. आपण उध्दव ठाकरे यांच्यासोबत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकणार नाही असे वाटून काही लोक बाहेर पडले. उध्दव ठाकरे हे नेते होणार असल्यामुळे जर शिवसेनेला अशी गळती लागणार असेल तर त्यांना शिवसेना प्रमुख करावे की नाही यावर बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत विचार करायला हवा होता. पण त्यांनी तो केला नाही. शिवसेनेच्या गळतीपेक्षा त्यांना पुत्रप्रेम महत्त्वाचे वाटले.

उध्दव ठाकरे यांनासुध्दा या गोष्टीची जाणीव होती. परंतु जगातला कोणताही राजकीय पुढारी स्वतःतल्या दोषांकडे कधी आत्मपरीक्षण करून पहात नसतो. उध्दव ठाकरेही त्याला अपवाद नाहीत. जे लोक बाहेर पडले ते स्वार्थापोटी बाहेर पडले, आपल्यात काही दोष नाही अशी त्यांनी आपल्या मनाची समजूत करून घेतली आणि जे लोक बाहेर जाऊ इच्छित असतील त्यांच्याकडे ते पहात बसले. ज्यांना आपले नेतृत्व नको आहे त्यांनी खुशाल बाहेर पडावे, आपण आपली एक टीम उभी करू जी नवी शिवसेना असेल असे उध्दव ठाकरे यांचे म्हणणे आहे. आता मोहन रावले बाहेर पडले. त्यांच्यामागोमाग आणखीही नाराज लोक पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. उध्दव ठाकरे यांचेसुध्दा याबाबतीत काही म्हणणे असणारच आहे. बाळासाहेबांनी ज्यांचे लाड केले, लायकी नसताना ज्यांना मोठे केले त्या सगळ्या लोकांना आपली खरी लायकी आणि तिच्या आपण किती मोठे झालो हे समजत नाही. त्यांना एकदाच संधी दिली की त्यांच्या महत्त्वाकांक्षा अवास्तव वाढत जातात आणि असे लोक आपल्याला पुन्हा संधी मिळणार नाही असे दिसायला लागले की शिवसेनेवर टीका करायला लागतात. तेव्हा असे लोक पक्षाच्या बाहेर पडले तरी चालतील.

नव्या लोकांना संधी मिळालीच पाहिजे. अशा लोकांना सोबत घेऊन आपण शिवसेनेला चालना देऊ, असे उध्दव ठाकरे यांचे म्हणणे आहे. उध्दव ठाकरे यांची ही कल्पना कितपत सत्यात येते आणि ते किती सक्षम नवी टीम उभी करू शकतात याविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही त्या दृष्टीने दिशादर्शक होती. उध्दव ठाकरे यांनी ही महानगरपालिका जिंकून दाखवली. तेव्हा उध्दव ठाकरे यांची टीम चांगली असेल असा संकेत मिळाला. कदाचित त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास बळावलाही असेल. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा ङ्गडकवण्यासाठी एवढे यश पुरेसे नाही. महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये शिवसेनेचा प्रभाव ओसरत चालला आहे. मराठवाड्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास टाकणारे शिवसैनिक मोठ्या संख्येने निर्माण झाले होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठीचा संघर्ष आणि रामजन्मभूमीचे आंदोलन या पार्श्‍वभूमीवर समाजातला एक मोठा गट शिवसेनेकडे आकृष्ट झालेला होता. त्याशिवाय प्रदीर्घ काळ सत्तेपासून वंचित राहिलेल्या ओबीसी वर्गाचा कल शिवसेनेकडे होता. या काही अनुकूल गोष्टींच्या आधारे बाळासाहेबांनी शिवसेनेला मराठवाड्यात मोठे स्थान मिळवून दिले होते. अनेक कार्यकर्ते त्यांच्या प्रभावाखाली तयार झाले होते. मात्र आता हे वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे आणि १९९० च्या दशकातले अनेक शिवसेना नेते शिवसेनेपासून दूर गेले आहेत.

कोकणात तर काय परिस्थिती आहे हे आपण पाहतच आहोत. सिंधुदूर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा प्रभाव ओसरला आहे. नारायण राणे तिथे वर्चस्व वाढवत आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या क्षमतेने महाराष्ट्रातल्या शिवसेनेला नवे बळ देता येईल असे काही वाटत नाही. त्यांनी नवी टीम उभी केली पाहिजे ही गोष्ट खरी त्यासाठी काही जुन्या लोकांना नाराज करावे लागेल हेही खरे आहे. परंतु या जुन्या लोकांचा प्रश्‍न जेवढ्या परिपक्वतेने हाताळला पाहिजे तेवढ्या परिपक्वतेने ते हाताळत नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला एक मोठा पाठिंबा मिळत राहील किंवा वाढेल असा एखादा विषय किंवा एखादा विचार, लाट, आंदोलन काही दिसत नाही. तसे विषय निर्माण करण्याची वैचारिक क्षमता उध्दव ठाकरे यांच्यात नाही. त्यामुळे त्यांनी ङ्गार सबुरीने वागून नवी टीम उभी करतानाच जुन्यांचाही वापर योग्य पध्दतीने केला पाहिजे. ते कौशल्य त्यांच्यात दिसत नाही. मुळात बाळासाहेब हयात असतानाच १९९५ चा अपवाद वगळता शिवसेनेला कधी सत्ता मिळालेली नाही. तेव्हा त्यांच्या पश्‍चात ती पुन्हा मिळणे ङ्गार अवघड आहे. हे उध्दव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही.

Leave a Comment