
सोशल नेटवर्कींग साईटमध्ये फेसबुकने आपले स्थान अव्वल राखले असले तरी सोशल मेसेजिंग मध्ये मोबाईलवरच्या व्हॉटस अॅपने फेसबुकला मागे सारत पहिला क्रमांक पटकावला आहे. या संदर्भात ऑन डिव्हाईस संस्थेने केलेल्या पाच देशांतील सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. या सर्वेक्षणात व्हॉटस अॅप नवीन मार्केट लिडर म्हणून उदयास आले असून त्याने अॅपलच्या आयमेसेज, गुगलच्या हँगआऊट, बीबीएम मेसेंजर, स्नॅपचॅट, स्काईप या सर्व लोकप्रिय अॅपना मागे टाकले आहे. अमेरिका, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया व चीन या पाच देशांत हे सर्वेक्षण केले गेले. सर्वेक्षणात विंडोज फोनच्या ग्राहकांचा समावेश केला गेला नव्हता.