
चेन्नई – भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अर्थात इस्त्रोच्या मंगळयानाने कालच पृथ्वीच्या गुरुत्वाकक्षेतून यशस्वीरित्या बाहेर पडल्यानंतर चंद्राची कक्षाही ओलांडली आहे. इस्त्राने पीटीआला दिलेल्या माहितीनुसार, हे यान प्रतिदिन सुमारे 10 लाख कि.्रमी.चा प्रवास करत आहे. मंगळयानाने चंद्रयानाची कक्षा ओलांडल्यानंतर चंद्राचीही कक्षा ओलांडली आहे. आता हे यान चंद्राच्याही पलीकडे मंगळाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.