नासा चंद्रावर फुलवणार भाजीपाल्याचा मळा!

वॉशिंग्टन – अमेरिकेची नासा ही अवकाश संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बिया पाठविण्याचे नियोजन करत असून, 2015 मध्ये तेथे भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्रिटनमधील एका संकेतस्थळाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

चंद्रावर बिया पाठवून पाणी असलेल्या ठिकाणी भाजीपाल्यांची शेती करण्याचा प्रयोग नासा करणार आहे. नासामधील अनेक वैज्ञानिक यावर संशोधन करत आहेत. पृथ्वीवरून चंद्रावर बिया पाठवून त्याचे रोप तयार करणे. विविध प्रकारच्या बियांवरही याबाबत संशोधन सुरू आहे. चंद्रावरील हवामानाचा शेती पिकासाठी कितपत उपयोग होऊ शकतो याविषयी शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.

शास्त्रज्ञांच्या अभ्यासाला नक्कीच यश मिळू शकेल, असे वृत्त देण्यात आले आहे. नासाकडून चंद्रावर एक रोपटे पाठविण्यात येणार आहे. चंद्रावर हे रोपटे जिवंत राहिले तर पुढील काम सोपे होईल, असे नासामधील प्रवक्त्यांनी सांगितले. चंद्रावर रोपटे 14 दिवस टिकू शकले तर किरणोत्सर्गाद्वारे त्याचे झाडामध्ये रूपांतर होऊ शकेल. पुढे ते 60 दिवस कसे टिकू शकेल, याबाबत संशोधन सुरू आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले.

Leave a Comment