नासा घेत आहे दुस-या पृथ्वीचा शोध

मुंबई – आगामी काळातील काही वर्षांमध्ये पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधण्यात यश येईल, अशी आशा नासाचे संचालक डॉ. जयदिप मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे. पृथ्वीसारखे वातावरण आणि जीवन असलेले ग्रह शोधण्याच्या मोहिमेवर नासाचे शास्त्रज्ञ सध्या काम करत आहेत. त्यात आगामी काळात नासाचे शास्त्रज्ञ यशस्वी होतील असा दावाही त्यांनी केला आहे.

मुंबईच्या वरळी येथील नेहर सेंटरमध्ये `नासा सर्च फ़ॉर अनादर अर्थ` या विषयावर डॉ. जयदेव मुखर्जी बोलत होते. यावेळी मागदर्शन करताना मुखर्जी यांनी नासा आगामी काळात करीत असलेल्याब कामा संदर्भात माहिती करून दिली.

यावेळी पुढे बोलताना, नासाचे संचालक डॉ. जयदिप मुखर्जी म्हाणाले, पृथ्वीच्या आकाराएवढे दोनशे ग्रह या सृष्टीत असून याबाबतचे ठाम पुरावे मात्र अजून नासाकडे उपलब्ध नाहीत. अद्याप तंत्रज्ञान विकसित न झाल्यामुळे पृथ्वीसारखे ग्रह प्रत्यक्ष बघता येत नसले तरी वेगवेगळ्या पद्धतीने केवळ अंदाज बांधून असे ग्रह आहेत.