डिसेंबर २०१३ – आगळावेगळा महिना

यंदाच्या वर्षीचा म्हणजे २०१३ सालचा डिसेंबर हा आगळावेगळा महिना ठरणार आहे. या शतकात आला नाही व पुढेही येणार नाही असा अनोखा योग या महिन्यात आला आहे. या डिसेंबरमध्ये पाच रविवार, पाच सोमवार व पाच मंगळवार आले आहेत. म्हणजेच तीन वार पाच वेळा एकाच महिन्यात येण्याचा हा योग दुर्मिळ आहे.

या महिन्यातील ११ तारीखही अशीच युनिक आहे. या दिवशी जन्म होणार्‍यांसाठी , विवाह होणार्‍यांसाठी ११/१२/१३ अशी मजेदार आकडेवारी येणार आहे. विसाव्या शतकातील १३ व्या वर्षाचा डिसेंबर रविवार पासून सुरू झाला आहे. ज्योतिषांच्या मते ११ या आकड्याची बेरीज दोन येते. हा आकडा चंद्राचा कारक आहे त्यामुळे ११ तारखेचा प्रभाव अतिशय शुभ आहे. कोणत्याही शकुनासाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे. १२ वा महिना म्हणजे बेरीज तीन. हा आकडा गुरू ग्रहाचा आहे तर २०१३ याची बेरीज येते ६. हा आकडा शुक्राचा आहे. त्यामुळे ११/१२/१३ ही तारीख विशेष वेगळी म्हणावी लागेल.

अर्थात एकाच महिन्यात तीन वार पाचवेळा येणे हे संघर्षाचेही लक्षण असल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. मोठ्या नेत्यांचे अपमान, पक्षबदलांमुळे सरकार कोसळणे किंवा सीमा भागात तणाव अशी संकटे येऊ शकतात.

Leave a Comment