तरुण तेजपाल अखेर गजाआड

पणजी – सहकारी पत्रकार महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून वादग्रस्त ठरलेले तहलका डॉट कॉमचे संपादक तरुण तेजपाल यांना शनिवारी रात्री गोवा पोलिसांनी अटक केली. आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी गेल्या दहा दिवसांपासून प्रयत्नात असलेल्या तरुण तेजपाल यांचे त्यासाठीचे प्रयत्न काल रात्री गोव्यातील पणजीच्या सत्र न्यायालयाचे न्यायाधीशांनी जामीन नाकारल्यानंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आले.

अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत न्यायालयासमोर उभे करावे लागणार आहे. तरुण तेजपाल शुक्रवारी दिल्लीहून विमानाने गोव्यात आले. तेव्हापासून त्यांना अटक होणार की, जामीन मिळणार यासंबंधीची चर्चा जोरदारपणे सुरू झाली. त्यांच्या जामीनाच्या अर्जाचे नाट्य रात्रीपर्यंत सुरू राहिले. खरे तर दुपारी त्याची सुनावणी संपली होती आणि न्यायाधीश साडेचार वाजता निर्णय देतील असेही जाहीर झाले होते. परंतु तरुण तेजपाल यांच्या वकिलांनी आपली कैङ्गियत ङ्गारच पाल्हाळपणे मांडायला सुरूवात केली. त्यामुळे साडेचारच्या ऐवजी रात्री निकाल दिला गेला.

आता तेजपाल यांना न्यायालयासमोर उभे केल्यानंतर त्यांना किती दिवसाची आणि कोणती कोठडी मिळते याचा निकाल लागणार आहे. या संपादकाने आपल्या मुलीच्या वयाच्या या पत्रकार महिलेवर ७ आणि ८ नोव्हेंबर असे दोन दिवस लैंगिक अत्याचार केले. विलक्षण मानसिक घुसमट झालेल्या या तरुणीने २२ नोव्हेंबरला आपली तक्रार दाखल केली आणि तेव्हापासून तरुण तेजपाल यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यानच्या काळात तरुण तेजपाल यांनी एका बाजूला गुन्हाही कबूल केला, त्या मुलीला एसएमएस पाठवून तिची क्षमाही मागितली. जाहीरपणे गुन्ह्याची कबुली देऊन प्रायश्‍चित्त घेणार असल्याचे घोषित केले. शिवाय त्यांनी एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये केलेला हा उद्योग कॅमेर्‍यात बंद झाला आहे. सारे पुरावे तरुण तेजपाल यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा होण्याची शक्यता आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, कारण अलीकडेच झालेल्या नव्या कायद्यामुळे तशी तरतूद झालेली आहे.

Leave a Comment