शीला दीक्षितांच्या मतदारसंघात मोदींच्या सभेला परवानगी नाही

दिल्ली –  मुख्यमंत्री शीला दिक्षित उमेदवार असलेल्या नवीन दिल्ली मतदारसंघात भाजपचे स्टार प्रचारक व पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना सभा घेण्याची परवानगी दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलने नाकारली आहे. पुढील आठवड्यात दिल्ली विधानसभेसाठी मतदान होत असून त्या निमित्ताने भाजपच्या शेवटच्या प्रचार दौर्‍यात मोदी आज  चार सभा घेणार होते. त्यासाठी नवीन दिल्ली मतदारसंघातील सभेसाठी भाजपने कौन्सिलला विनंती केली होती मात्र सुरक्षेचे कारण देऊन महापालिका कौन्सिलने मोदींच्या सभेला परवानगी नाकारली असल्याचे समजते.

भाजपने मोदी यांच्या सभेसाठी चार जागा सुचविल्या होत्या मात्र या मतदारसंघातच मोदींना सभा घेण्याची परवानगी दिली गेलेली नाही. या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप सरळ लढत झाली असती तर भाजपला विजयाची खात्री होती. आम आदमी पार्टीचे केजरीवाल यांनी येथे मोठे आव्हान उभे केले आहे व त्यामुळे दीक्षित यांच्या विरोधातील मतांचे विभाजन होण्याची भीती भाजपला आहे. दीक्षित गेली १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर आहेत. मोदींची वाढती लोकप्रियता आणि दीक्षित यांच्या विरोधात गोळा होत असलेले जनमानस याचा फायदा भाजपला घ्यायचा आहे आणि त्यासाठीच मोदींची सभा येथे होणे आवश्यक होते असे भाजप नेते सांगत आहेत.

Leave a Comment