रक्षक रिश्ते- खास डिफेन्स पर्सोनल साठी मॅट्रीमोनी साईट

पुणे – देशाच्या संरक्षण कार्यात मग्न असलेल्या डिफेन्समधील लोकांसाठी रक्षक इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम फर्मने देशातील पहिलीवहिली मॅट्रीमोनी साईट सुरू केली असून तिचे उद्घाटन १ डिसेंबरला होत आहे. व्हॅलेंटाईन डे पर्यंत या साईटसाठी उपवरांना मोफत नोंदणी करता येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना समन्वयक माया पाठक म्हणाल्या की अशा प्रकारे प्रथमच डिफेन्स पर्सोनलसाठी साईट सुरू केली गेली आहे. या सवेत असणार्‍या लोकांना देशाच्या कानाकोपर्‍यात कुठेही बदलीवर जावे लागते. मात्र जेव्हा स्वतः अथवा मुलाबाळांसाठी जोडीदार शोधायचा असतो तेव्हा समाजापासून दूर असल्याने त्यांना अनेक अडचणी येतात. त्यांना योग्य जोडीदार देशाच्या कुठल्याही भागातून शोधता यावा असा यामागे उद्देश आहे. निमलष्करी दले, माजी सैनिक व त्यांचे नातेवाईक या साईटवर नोंदणी करू शकणार आहे.

नातेवाईकांनाही नोंदणीसाठी परवानगी दिली गेली आहे कारण त्यामुळे ज्यांना लष्करी सेवेतील जोडीदार हवा आहे त्यांना तशी निवड करता येईल व लष्करी सेवेतील उपवर वरवधूला सिव्हील सोसायटीतील जोडीदार हवा असेल तर त्यांनाही चॉईस मिळू शकेल. ज्यांना या साईटवर माहिती द्यायची आहे ते फोटोसह माहिती देऊ शकणार आहेत आणि उपलब्ध प्रपोजलमधून आपला जोडीदार निवडूही शकणार आहेत.

रक्षक इन्फ्रास्ट्रक्चर ही बांधकाम फर्म लष्करी लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे.

Leave a Comment