नॅनो कारची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलणार

सिंगापूर : नॅनो कारची जाहीरात सर्वात स्वस्त कार अशा शब्दात करणे ही मोठी चूक होती असे टाटा उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी म्हटले आहे. आता नॅनो कार अन्य देशात लॉंच करताना तिची प्रतिमा सर्वात स्वस्त कार अशी तयार न करता ‘परवडणारी कार’ अशी करावी लागणार आहे, असे रतन टाटा म्हणाले. आता या कारचे मार्केटिंग इंडोनेशियामध्ये करावयाचे आहे. त्यावेळी ही बदललेली प्रतिमा समोर आणली जाईल असेही त्यांनी सांगितले.

इंडोनेशियाबरोबरच यूरोप खंडातल्या काही देशांमध्येही नव्या काही देशांमध्ये नॅनो कारचे मार्केटिंग नव्या धोरणांनिशी केले जाईल, तसा विचार कंपनीत सुरू आहे. अशी माहिती टाटा यांनी दिली. यूरोपात मार्केटिंग करताना टाटा मोटारीच्या स्वरूपातसुध्दा काही बदल केले जाणार आहेत.

भारतामध्ये ही कार बाजारात आणताना एक वेगळा दृष्टीकोन डोळ्यासमोर होता. मोटारसायकलवर सगळे कुटुंब बसून जाताना टाटांनी पाहिले होते आणि अशा दुचाकी वाहनधारकांना परवडणारी कार उपलब्ध करून द्यावी असे त्याच्या मनात त्यावेळी आले होते. मात्र अशी कार देताना ती सर्वात स्वस्त कार म्हणून बाजार आणली. त्यातून काही गैरसमज निर्माण झाले असेही दिसून आले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नॅनो कारचे दोन नवीन मॉडेल्स बाजारात आणण्यात आले आहेत आणि त्या मॉडेलची रचना करताना तिच्या मार्केटिंगचाही विचार केला गेला आहे.