‘धूम ३’ पाहण्यासाठी करावे लागणार ५०० रुपये खर्च

बॉलीवुडमधील या वर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘धूम ३’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या सिनेमाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यशराजचा हा सर्वात मोठा सिनेमा म्हणून चर्चा रंगते आहे. मात्र, हा मोठा सिनेमा प्रेक्षकांच्या खिशाला कात्री लावणार आहे. ‘धूम ३’ पाहण्या्साठी करावे लागणार ५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

यशराज बॅनरने मल्टिप्लेक्समधील ‘धूम ३’च्या एका तिकिटाची किंमत ५०० रुपये इतकी ठेवण्याचे निश्चित केली आहे. आयमॅक्स फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणारा हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा असल्यामुळे तिकिटाच्या किंमतीत वाढ केल्याचे म्हटले जात आहे.’धूम’ या सीरिजचा पहिला भाग २००४साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘धूम २’ हा २००६साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात ऋतिक रोशनचा दमदार अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळाला होता.

आगामी काळात आत ‘धूम ३’ मध्ये आमिर खान धमाका करायला सज्ज झाला आहे. आमिरसह या सिनेमात अभिषेक बच्चन, कतरिना कैफ आणि उदय चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शित केला आहे. आगामी काळात येणारा हा सिनेमा बिगबजेट असल्याने या सिनेमाविषयी सर्वांना उत्सुकता आहे.

Leave a Comment