अखेर ऊसदरवाढ आंदोलन मागे

कोल्हापूर – ऊसदरासाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. 1 जानेवारीपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

2 हजार 650 रुपये पहिली उचल घ्यायला तयार असल्याचं राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. पण एवढी उचल मिळाली नाही तर पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने कारखानदारांचा वापर केला. आंदोलकांना भडकवण्यामागे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचा हात असल्याचा गंभीर आरोपही राजू शेट्टींनी केला. दरम्यान, कागल तालुक्यातला बिद्री साखर कारखान्याने 2700 रुपये दर केला जाहीर केलाय अशी माहिती अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली आहे.

Leave a Comment