पाळत ठेवलेल्या त्या महिलेसोबत मोदी

नवी दिल्ली- गुजरात सरकारने पाळत ठेवलेल्या त्याफ महिलेसोबतचे नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र गुलेल या शोधपत्रकारीता वेबसाइटने प्रसिद्ध केले आहे. याआधी याच वेबसाइटने मोदींचे सहकारी अमित शाह आणि निलंबित पोलिस अधिकारी जी.एल. सिंघल यांच्यातील फोनवरील संभाषणाची टेप प्रसिद्ध केली होती.

गुलेलने प्रसिद्ध केलेल्या या छायाचित्रांमुळे माधुरी (वेबसाइटने बदललेले नाव) या महिलेला मोदी 2005 पासूनच ओळखत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रसिद्ध झालेले छायाचित्र कच्छमध्ये 2005 मधील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या शारदोत्सवात काढण्यात आले होते. त्यातील एका छायाचित्रात पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा, मोदी आणि त्यांच्यासोबत माधुरी उभी असल्याचे दिसते.

मूळची भूजची असलेली पण बंगळूरुमध्ये स्थायिक झालेल्या या तरुणीबरोबर आपण 2004 मध्ये हिल गार्डनच्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदींची ओळख करुन दिली होती. तेव्हा ती तरुणी 27 वर्षांची होती. त्यानंतर अनेक वर्ष ती तरुणी आणि नरेंद्र मोदी संपर्कात होती असे प्रदीप शर्मा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या छायाचित्रांमुळे प्रदीप शर्मा यांच्या म्हणण्याला आता दुजोरा मिळाला आहे.

Leave a Comment