सचिन युनिसेफचा ब्रँड अँबॅसिडर

मुंबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर मैदानाबाहेर आपली सेवा देण्यासाठी सिद्ध झाला असून दक्षिण आशियातील स्वच्छता आणि सफाईसाठी काम करणार आहे. गुरूवारी एका कार्यक्रमात युनिसेफने सचिनला दक्षिण आशियासाठीचा आपला पहिला ब्रॅड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले असून पुढील दोन वर्षे सचिन हे पद भूषविणार आहे.

या विषयी बोलताना सचिन म्हणाला की गेली सात आठ वर्षे मी युनिसेफशी जोडलेला आहे. मात्र आपला दूत बनवून यनिसेफने आयुष्याची दुसरी इनिंग खेळण्याची संधी दिली आहे याचा खूप आनंद आहे. माझ्या पूर्ण ताकदीनिशी आणि क्षमतेने मी हे काम करणार आहे कारण ही इनिंगही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अस्वच्छतेमुळे जगात दररोज १६०० बालके डायरिया होऊन मृत्यमुखी पडतात. हे आकडे बैचैन करणारे आहेत. माझ्या कामामुळे ही संख्या कमी होऊ शकली तर माझी इनिंग यशस्वी झाली असे मी मानेन.

Leave a Comment