
नवी दिल्ली – विवाह न करता एकत्र राहण्याच्या लिव्ह इन रिलेशनला कायदेशीर दर्जा देण्यासाठी सरकारने आवश्यक तो कायदा केला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारला सुचविले आहे. न्यायमूर्ती के.एस. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. लिव्ह इन रिलेशन कायद्याने मंजूर असले तरी अशा संबंधात महिलेचा कौटुंबिक छळ झाला तर तिला दाद मागता येत नाही. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा या संबंधात असणार्या महिलेला लागू करावा, असेही या खंडपीठाने सुचविले.
