
दिल्ली – दिल्लीतील विधानसभा निवडणूकांत काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता धूसर दिसत असतानाच या दोन्हीही पक्षांशी हातमिळवणी करणार नाही असे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूकात आम्हाला बहुमत मिळाले नाही तरी आम्ही कोणत्याच पक्षासोबत जाणार नाही कारण असे करणे ही जनतेची फसवणूक ठरेल असे सांगून ते म्हणाले की आम्ही सत्तेवर नाही आलो तरी राजकारणात कायम राहणार आहोत.
