जंतुनाशके निष्प्रभ होत आहेत

जंतुनाशकांचा शोध लागला तेव्हा मानवतेच्या इतिहासात त्याचा उल्लेख मैलाचा दगड म्हणून करण्यात आला. कारण पूर्वीच्या काळी कोणत्या जंतुमुळे कोणता रोग होतो हे कळत नव्हते. मग त्या जंतुचा नाश करण्याचा प्रश्‍नच नाही. परंतु जंतुनाशकांच्या शोधामुळे वैद्यकीय उपचाराला नवी दिशा मिळाली. अनेक प्रकारची जंतुनाशक तयार करण्यात आली. ती जंतुनाशके शरीरात टोचली की, त्या विशिष्ट जंतुंचा आपोआप नाश व्हायला लागला.

जंतुंच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जंतु सजीव असतात आणि प्रत्येक सजीवाच्या शरीरात प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची ताकद असते. तशी परिस्थिती उद्भवली की, त्याच्या शरीरामध्ये तिच्याशी सामना करण्याची यंत्रणा आपोआप विकसित व्हायला लागते. जंतुनाशकांच्या बाबतीत असेच झाले. जंतुनाशके ही जंतुंचे शत्रू असल्यामुळे त्यांच्याशी कसा सामना करावा, याचा विचार जंतुंमध्ये सुरू झाला आणि त्यांच्या शरीरात असे बदल झाले की, त्यांच्यावर जंतुंचा काही परिणाम होईनासा झाला. सध्याच्या वैद्यकीय क्षेत्रापुढे हा प्रश्‍न गंभीरपणे उभा आहे.

जंतुंमध्ये जंतुनाशकांचा प्रतिकार करण्याची शक्ती असल्यामुळे रुग्णांच्या बाबतीत नव्या समस्या निर्माण होत आहेत. एखाद्या संसर्गासाठी डॉक्टर रुग्णाला जंतुनाशक देतात. परंतु त्याच्यामुळे तो संसर्ग दुरुस्त होतच नाही आणि रुग्णाचा मृत्यू होतो. अमेरिकेतल्या सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये निष्प्रभ ठरलेली जंतुनाशके कोणती यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सेंटर्स ङ्गॉर डिसिज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेन्शन या संस्थेमध्ये निष्प्रभ ठरू पाहणार्‍या जंतुनाशकांवर संशोधन सुरू आहे. त्यामुळे संसर्ग दुरुस्त होत नाहीत हे तर खरेच, पण ते संसर्ग वाढत जातात.

रुग्णालयामध्ये अशा प्रकारचे संसर्ग पसरत जाणे मोठे धोक्याचे मानले जाते. कारण त्यामुळे अन्य रुग्णही मरू शकतात. अमेरिकेत या कारणाने गेल्या सहा महिन्यात २०० रुग्ण मरण पावल्याचे आढळले आहेत. एखाद्या जंतुच्या शरीरामध्ये जंतुनाशकाचा प्रतिकार करण्याची क्षमता त्या जंतुनाशकाच्या वारंवार वापरण्याने निर्माण होत असते. तेव्हा जंतुनाशकांचा अती वापर टाळला जावा आणि अपरिहार्य असेल तेव्हाच जंतुनाशक वापरावे तर ही प्रतिकार शक्ती वाढण्याची प्रक्रिया कमी होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment