शोमा चौधरींच्या घरावर भाजपने काळं फेकलं

लखनौ – तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांच्याविरोधात भाजपने नारेबाजी केली. शोमा यांच्या घराला काळे फासण्यात आले आहे. तर तरुण तेजपाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले आहे.

लैंगिक अत्याचाराचे आरोपी तहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप शोमा चौधरींवर आहे. त्यामुळे तरुण तेजपाल यांच्यासह शोमाही भाजपच्या निशाण्यावर आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी तरूण तेजपाल यांचा प्रतिकात्मक पुतळाही पेटवला. तेजपाल हे काँग्रेसच्या इशार्‍यावरून काम करत होते. त्यामुळे त्यांनी पत्रकारिताही कलंकित केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

त्यामुळे तेजपाल यांना त्वरीत अटक करून, कडक शिक्षा द्या, अशी मागणी भाजप महिला आघाडीने केली आहे. शोमा चौधरी यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेजपाल सेक्स स्कँडल प्रकरणात तहलकामधून राजीनामा देणार्‍या पत्रकारांची संख्या सातवर पोहोचली आहे.

Leave a Comment