नवी दिल्ली- संसदेचे हिवाळी अधिवेशन 5 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालावे, या उद्देशाने लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी 3 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

मागील अनुभव पाहता यावेळचे अधिवेशनही वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. या अधिवेशनात तेलंगण राज्य निर्मितीबाबतचे विधेयक मांडले जाण्याची चिन्हे आहेत. या विधेयकाला अखंड आंध्र प्रदेश समर्थकांकडून कडाडून विरोध केला जाईल, अशी शक्यता आहे.
केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांकडून आणि प्रामुख्याने भाजपकडून विविध घोटाळे, महागाई आदी मुद्दे पुढे केले जातील, असे समजते. तर, भाजपला शह देण्यासाठी सरकारचे नेतृत्व करणार्या काँग्रेसकडून गुजरातमधील पाळत प्रकरणाचा आधार घेतला जाऊ शकतो. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातही गदारोळाची स्थितीच पाहायला मिळेल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर, मीरा कुमार यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महत्त्व आहे.