तेजपाल यांनी मागितला आणखी वेळ

नवी दिल्ली- सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले तहलकाफ मासिकाचे संपादक तरुण तेजपाल यांनी गुरूवारी गोवा पोलिसांना पत्र लिहून शनिवारपर्यंत वेळ मागितला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता गुप्ता यांच्याकडे तेजपाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय शुक्रवारी सुनावणी करणार आहे. त्यापूर्वी गोवा पोलिसांनी त्यांना गुरुवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तेजपाल यांनी गोवा पोलिसांना पत्र लिहून आणखी दोन दिवसांचा वेळ द्यावा अशी विनंती केली आहे.

गोव्यातील थिंक फेस्ट समारोहप्रसंगी हॉटेलमध्ये सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा तेजपाल यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून गोवा पोलिसांनी त्यांना गुरुवारी दुपारी तीनपर्यंत जबानीसाठी हजर होण्याचे समन्स बजावले आहे.

Leave a Comment