डोकेदुखी औषधाविना पळवा

माणसाला डोके एकच असते, पण डोकेदुखीची कारणे मात्र अनेक असतात आणि औषधीही अनेक असतात. डोकेदुखी थांबण्यासाठी घेतल्या जाणार्‍या या औषधांनी डोकेदुखी थांबली तरी औषधांचे अन्य परिणाम होत राहतात. म्हणून शक्यतो औषध किंवा गोळी न घेता डोकेदुखी थांबवली पाहिजे. त्यासाठी खालील उपाय योजावेत. डोके दुखायला लागले की, भरपूर स्वच्छ पाणी प्यावे. कारण कॉङ्गी आणि मद्य जास्त पिण्यात आले की, डी-हैड्रेशन होते आणि त्यामुळे डोके दुखते. भरपूर पाणी पिले की, डी-हैड्रेशन कमी होत डोकेदुखी थांबते.

काही वेळा थकावटी-मुळे किंवा रक्ताभिसरण वेगाने होत नसल्या मुळे डोके दुखते. अशा वेळी थोडासा हलका व्यायाम करावा. अर्धा कि.मी. पर्यंत पळावे किंवा भरभर चालावे. जमल्यास पोहावे. रक्ताभिसरण वेगात सुरू होऊन डोकेदुखी थांबते. डोकेदुखी थांबविण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवाव्यात. त्या थोड्या थोड्या वेळाने बदलाव्यात. साधारण पाच मिनिटात डोकेदुखी थांबायला हरकत नाही.

हसण्याने सुद्धा डोकेदुखी थांबते. कारण तणावामुळे आणि चिंतेमुळे डोकेदुखी वाढत असते. तणाव कमी करण्याकरिता टी.व्ही.वरल्या विनोदी मालिका बघाव्यात किंवा कॉमिक्स् वाचावेत किंवा विनोदी कथांचे पुस्तक वाचावे. बाजारात विनोदी चुटक्यांची पुस्तके मिळतात. ती वाचून खदखदून हसलो की, डोकेदुखी कमी होते.

झोप कमी झाल्यावर सुद्धा डोके दुखू शकते. तेव्हा डोके दुखायला लागल्यास झोप घ्यावी आणि एरवी सुद्धा भरपूर झोप घ्यावी. सातत्याने कमी झोप मिळत गेली की, डोके दुखते. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये लोक भरपूर काम करायला लागले आहेत. झोपेचे आणि जेवणाचे भान राहिलेले नाही. त्यातून आरोग्याचे काही प्रश्‍न उद्भवत आहेत. डोकेदुखी हे या सर्व प्रश्‍नांचे मुख्य लक्षण आहे. तेव्हा हे डोकेदुखी कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहेच, पण आपली दैनंदिनीच अशी असली पाहिजे की, पुरेशी झोप मिळत रहावी.

डोकेदुखीवर आणखी एक इलाज म्हणजे डोके आणि कानशिले यांचे हलकेच मर्दन करावे. भुवया अंगठा आणि तर्जनी यांच्या चिमटीत गच्च धरून ओढाव्यात. त्यामुळे सुद्धा डोेकेदुखी थांबण्यास मदत होऊ शकते. मॅग्निशिअम आणि कॅल्शियम विपुल प्रमाणात असलेले खाद्य पदार्थ खाणे हा सुद्धा डोकेदुखीवरचा एक इलाज होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment