स्ट्रॉबेरीने हृदय होते मजबूत

स्ट्रॉबेरी आणि ब्ल्यू बेरी या ङ्गळांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे. सर्क्युलेशन या मासिकामध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले असून या दोन ङ्गळांमुळे हृदय विकारापासून सुटका होऊ शकते असे त्यात म्हटले आहे. या दोन ङ्गळांचा हा परिणाम सर्वसाधारणत: जाणवतोच, परंतु तो महिलांच्या बाबतीत अधिक प्रभावी असल्याचे दिसते. अमेरिकेतील २५ ते ४२ या वयोगटा तील ९३ हजार ६०० महिलांची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष निघाला आहे.

या महिलांची ङ्गळे खाण्याची सवय, ङ्गळे खाण्याचे प्रमाण आणि ङ्गळांचा प्रकार यांचे सुमारे १८ वर्षे निरीक्षण करण्यात आले. तेव्हा निघालेला निष्कर्ष शास्त्रीय भाषेत मांडण्यात आला आहे. सगळ्या प्रकारची ङ्गळे खाऊन सुद्धा ज्या महिलांच्या खाण्यामध्ये आठवड्यातून तीन वेळा ही दोन ङ्गळे खाण्यात येतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ३२ टक्के कमी असते. अर्थात निव्वळ एवढ्याच एका कारणावरून निष्कर्ष काढता येत नाही. कारण हृदयविकारावर परिणाम करणारे इतरही अनेक घटक आहेत.

जाडी, कामाची पद्धत, हालचाली, व्यायाम, खाणे-पिणे, व्यसन यावरून तर हृदयविकाराची शक्यता कमी-जास्त होत असतेच. परंतु असे घटक समान असणार्‍या दोन महिलांची तुलना केली आणि त्यातल्या एका महिलेच्या खाण्यात स्ट्रॉबेरी आणि ब्ल्यू बेरी येत असेल तर ती ङ्गळे खाणार्‍या महिलेला न खाणार्‍या महिलेपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ३२ टक्के कमी असते. शास्त्रीय भाषेत असे सांगता येते. असे का होते? याची मीमांसा सुद्धा करण्यात आली आहे आणि त्या दृष्टीने या दोन ङ्गळांचे घटक तपासण्यात आले. तेव्हा असे आढळले की, या दोन ङ्गळांमध्ये ऍन्थोसायनीन या घटकांचे प्रमाण जास्त असते.

त्याशिवाय त्यात फ्लेओनॉईटस् असतात आणि हे दोन घटक हृदयाच्या पेशींचे विघटन थांबवतात. हे दोन घटक असले की, हृदयाच्या पेशी मजबूत राहतात आणि ही ङ्गळे खाणार्‍यांचे हृदयविकारापासून संरक्षण होते. हे दोन घटक रक्तवाहिन्यांना सुद्धा मजबुती देतात. ऍन्थोसायनीन हे द्रव्य लाल, निळ्या आणि जांभळ्या भाज्या आणि ङ्गळांमध्ये भरपूर असते. चेरीज्, द्राक्ष इत्यादी ङ्गळे या दृष्टीने उपयुक्त असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment