नुपूर तलवार मुळची साता-याची

सातारा : आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या तलवार दाम्पत्यापैकी नुपूरची आई मुळच्या सातारा येथील महाजनी घराण्यातली आहे तर वडील वाईचे असल्याचे समजते. अनेक वर्षे सातारमध्ये राहिलेल्या नुपूरच्या पालकांना मराठी भाषाही येते.

आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडात तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर नुपूरच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे. नुपूरची आई लता चिटणीस यांनी आपल्या पतीच्या शारीरिक अस्वास्थ्याबद्दल प्रसारमाध्यमांकडे माहितीही दिली आहे. शुद्ध मराठीत बोलणार्याश लता चिटणीस यांचे माहेर सातारचे आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नोएडा दिल्ली येथे स्था‍यिक झाले आहेत.

सातारा येथिल महाजनी घराण्यात जन्मलेल्या लताबाईंचा विवाह मिलिटरीतील एका अधिका-याशी झाला. नुपूरचे वडील मुळचे वाईचे. अनेक वर्षे भारतीय वायु दलात कॅप्टन म्हणून कार्यरत असणार्या. वडिलांना युद्धात शौर्य गाजवल्याबद्दल विशेष सेवापदकही मिळाले आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी या घराण्याचा सातारशी संबंध तुटला. त्यानंतर राजेश तलवारशी विवाह झाल्यामुळे नुपूर नोएडा (दिल्ली) येथेच स्थायिक झाली असल्याची माहिती मिळते.

Leave a Comment