चक्रीवादळामुळे आंध्र किनारपट्टीला सतर्कतेचे आदेश

हैदराबाद- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे चक्रिवादळ आगामी काळात धोकादायक होणार आहे. येत्याा दोन दिवसांसाठी लहेर चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने या नैसर्गीक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे चक्रिवादळ सध्या काकिनाडाच्या आग्नेयेस ९२० किलोमिटरवर असून २८ तारखेच्या दुपारी हे वादळ मछलीपट्टण आणि कलिंगपट्टणचा भाग पार करेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय. या वादळामुळे आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

आंध्रप्रदेशातील कृष्णा, पूर्व आणि पश्चीम गोदावरी, विशाखा पट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम आणि गुंटूंर या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. याआधी फायलिन आणि हेलेन वादळाचा जोरदार फटका बसला होता. त्याअनंतर आता लहेर वादळाची भीती व्यनक्ता केली जात आहे.

Leave a Comment