
घराण्याची प्रतिष्ठा प्रत्येकालाच प्रिय असते. आपल्याच मुलाकडून काही वेळेला त्या प्रतिष्ठेला बाधा आणली जाते. मुळात या प्रतिष्ठेच्या कल्पनाही कालबाह्य झाल्या आहेत. परंतु अजूनही काही लोक त्या प्रतिष्ठेपायी वाट्टेल ते करायला तयार असतात. ही प्रवृत्ती सुशिक्षित लोकातही दिसते. दिल्लीच्या आरुषी तलवार हत्याकांड प्रकरणात नेमके हेच घडले आहे. आपल्या मुलीने कुटुंबाला कलंक लावला या कल्पनेने दोघेही दंतवैद्य असलेले उच्चशिक्षित डॉक्टर पतीपत्नींनी आपल्या मुलीचाही खून केला आणि नोकराचाही खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या डॉक्टर दांपत्याला काल विशेष न्यायालयाने आमरण कारावासाची शिक्षा सुनावली. प्रकरण दिल्लीतले आणि मारेकरी डॉक्टर त्याचबरोबर एकाचवेळी दोन खून झालेले. त्यामुळे सार्या देशात या खुनाच्या खटल्याविषयी विलक्षण उत्सुकता निर्माण झालेली होती. नोएडा भागातील राजेश आणि नुपूर तलवार या दंतवैद्य दांपत्याने आपल्याच चौदा वर्षे वयाच्या आरुषी या मुलीचा खून केला आणि तिच्याबरोबर आपला नोकर हेमराज यालाही संपवून टाकले. या डॉक्टर दाम्पत्याने या खुनाशी आपला काही संबंध नाही अशी बतावणी केली होती. खून केल्याचा कसलाही प्रत्यक्ष पुरावा मागे ठेवला नव्हता.
सुशिक्षित माणूस निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखा सङ्गाईने खून करू शकत नाही. पण या दांपत्याने खून करून कसलाही प्रत्यक्ष पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र सीबीआयने या प्रकरणाची कसून तपासणी केली आणि परिस्थितीजन्य पुरावा अशा चातुर्याने गोळा केला की, न्यायाधिशांना या दोघांस खुनी ठरवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मोठ्या कौशल्याने आपल्याच पोटच्या पोरीची हत्या करून या दांपत्यांनी मोठा बनाव केला पण त्यांच्या मनाने त्यांना ङ्गसवले आणि त्यांची ही मनःस्थिती त्यांच्याच घरच्या मोलकरणीच्या साक्षीतून प्रकट झाली. ही साक्ष सर्वाधिक निर्णायक ठरली. या डॉक्टर दांपत्याने मुलीचा खून केला आणि तिला तिच्या बेडरूममध्ये कोंडले. नोकराची हत्या केली आणि त्याचे प्रेत ङ्गरङ्गटत नेऊन गच्चीवर टाकले. या दोघांची हत्या सारख्याच पध्दतीने झाली. १५ आणि १६ मे च्या मध्यरात्री त्यांनी या हत्या केल्या. सकाळीच त्यांची मोलकरीण कामाला आली तेव्हा तिला या मातेच्या बोलण्या वागण्यात मुलीचा खून झाल्याचे दुःख अल्पांशानेही आढळले नाही. उलट सदनिकेचा मुख्य दरवाजा सताड उघडा असताना, तो बाहेरून लावून नोकर कुठेतरी गेला आहे असे त्यांनी मोलकरणीला गरज नसताना सांगितले.
कितीही हुशारी केली तरी त्यांनी असे काही सबळ परिस्थितीजन्य पुरावे मागे ठेवले होते की, तेच आपल्याला जन्मभर जन्मठेपेला पाठवण्यास कारणीभूत ठरतील याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांची कन्या आरुषी हिचे नोकराशी शरीरसंबंध होते आणि ते सहन न झाल्यामुळे या पतीपत्नीने दोघांचाही काटा काढला असे दिसते. आता या निकालावर लोक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आपली चौदा वर्षाची मुलगी अशी बिघडलेली आहे हे कळताच त्यांना राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी हा खून केला. असे चित्र उभे राहिलेले आहे आणि काही सनातनी लोक डॉक्टरांचे समर्थनसुध्दा करत आहेत. हा मोठा वादग्रस्त विषय आहे. आपल्या आसपासचे वातावरण ङ्गार बिघडलेले आहे. त्यामुळे दुराचार माजला आहे. परंतु आपल्या मुलीचा असा पाय घसरला म्हणून तिच्यासह नोकराला मारून टाकावे हे योग्य नाही. असा एक विचारप्रवाह आहे. या दोघांना न्यायाधीशांनी गुन्हेगार ठरवले तेव्हा त्यांच्या वकिलांनी ही न्यायाची कुचेष्टा आहे असे म्हटले. आपल्या अशिलांनी खून केला नसताना त्यांना विनाकारण शिक्षा होत आहे असा युक्तिवाद त्याने केला. पण शेवटी ते वकिलाचे कामच असते. नंतर शिक्षा सुनावताना मात्र या वकिलाने ङ्गाशीच्या ऐवजी सौम्य शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या सौम्य शिक्षेचे समर्थन करताना आपल्या अशिलाच्या हातून रागाच्या भरात आणि उत्स्ङ्गूर्तपणे हे कृत्य घडले आहे असे प्रतिपादन केले.
या डॉक्टर दांपत्याला दोषी ठरवले तेव्हा ही न्यायाची चेष्टा आहे असे म्हणणारा हा वकील शिक्षेच्या वेळी मात्र हे कृत्य त्यांच्या हातून रागाच्या भरात घडले आहे असे मान्य करतो. खरे म्हणजे हीच वकिली व्यवसायाची चेष्टा आहे. परंतु सर्वात मोठी चिंतेची बाब ही आहे की दोघेही पतीपत्नी डॉक्टर म्हणजे उच्च विद्याविभूषित असतानाही त्यांना राग आवरता आला नाही, रागाच्या भरात आपण काय करतो आहोत याचे भान त्यांना राहिले नाही. मग शिक्षणाचा उपयोग काय? ऑनर किलिंगच्या कल्पना हरियाणा, राजस्थान अशा मोठ्या राज्यांमध्ये व्यापक प्रमाणावर बोलल्या जातात. परंतु तिथे या कल्पनांच्या आहारी जाणारे हे लोक अशिक्षित आणि जातीपातीच्या कल्पनांमध्ये गुंतलेले आहेत. पण डॉक्टर तलवार आणि त्यांची पत्नी हे तर उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांना या कल्पनांच्या बाहेर का येता आले नाही. समाजात अनेक मुली बिघडतात परंतु त्यांचे आईबाप तारुण्यसुलभ कृत्य म्हणून त्याकडे बघून मुलीला वळणावर आणतात. मुलामुलींच्या बिघडण्यामागे केवळ त्यांचाच दोष नसतो. समाजाचा, माध्यमांचा आणि आईवडिलांच्या दुर्लक्षाचाही तो परिणाम असतो. तेव्हा त्यांचा काटा काढणे हा काही त्यावरचा उपाय नाही. हे भान ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या डॉक्टर दांपत्याला राहिले नाही.