विकिलिक्सचा संस्थापक आणि अमेरिकेची लाखो गुप्त कागदपत्रे प्रकाशित करणारा ज्युलियन असांजे याला अमेरिका आरोपी बनविण्याची शक्यता धूसर असल्याचे वृत्त वॉशिग्टन पोस्ट या नामवंत वृत्रपत्राने अमेरिकन अधिकार्याचा हवाला देऊन प्रसिद्ध केले आहे.

र्याला गुप्त कागदपत्रे प्रकाशित करण्याबद्दल अमेरिका आरोपी बनविण्याची शक्यता फारच कमी असल्याचे या अधिकार्याचे म्हणणे असून त्याला असांजेचा वकील बॅरी पोलक यानेही दुजोरा दिला आहे. आरोपी न करण्याबद्दल अमेरिकन न्याय विभागाने मात्र अजून कांहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही. मात्र त्याला आरोपी केले गेले नाही तर असांजे न्याय विभागाला धन्यवाद देईल आणि त्यांच्या निर्णयाचे स्वागत करेल असे वकील पोलक यांचे म्हणणे आहे.
लैंगक छळ प्रकरणात असांजेचे स्वीडन सरकारला प्रत्यार्पण करण्यात येणार होते मात्र तेव्हापासून म्हणजे जून २०१२ पासून असांजे याने लंडन येथील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला आहे. स्वीडनला प्रत्यार्पण केले गेले तर त्याला अमेरिकेला पाठविले जाईल आणि तेथे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल अशी भीती असांजेने व्यक्त केली असून ब्रिटन पोलिस तो या दूतावासातून कधी बाहेर येतो याच्या प्रतीक्षेत आहेत.