पुण्यात सेक्स रॅकेट उघडकीस- सात जणांना अटक

पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे आता देहविक्रीचे केंद्र म्हणूनही उदयास आले असून येथे अनेक हॉटेलांमधून सर्रास सेक्स रॅकेट चालविली जात आहेत. पोलिसांनी या प्रकारांची दखल घेऊन सतत दक्षता आणि छापे टाकण्याची कारवाई सुरू ठेवली आहे मात्र तरीही हे प्रकार वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी सायंकाळी बालेवाडी येथील एका हॉटेलावर पोलिसांनी छापा टाकून तेथील ११ मुलींची मुक्तता केली. या प्रकरणात सात जणांना अटक केली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील अनेक हॉटेल्समधून अशी रॅकेट चालविली जात असल्याची खबर पोलिसांना आहे. त्यावरून गेल्या दोन दिवसांत विविध हॉटेलवर छापे मारण्यात आले आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशीरा बालेवाडी येथील हॉटेल सनावर छापा मारण्यात आला. या हॉटेलातही असले प्रकार चालल्याचे कळल्यावर पोलिसांनी येथे बनावट गिर्हा ईक पाठवून खात्री करून घेतली व नंतर छापा टाकला.हॉटेल मालक प्रशांत शेट्टी व दलाल केशव कृष्णा भटराई यांच्या संमतीने हा व्यवसाय येथे चालत असल्याचेही उघडकीस आले असून हे दोघेही फरारी झाले आहेत.

हॉटेल साना हे अत्यंत सुमार दर्जाचे हॉटेल असूनही येथील खोल्यांची भाडी मात्र पंचतारांकित हॉटेल्सप्रमाणे आहेत. ग्राहकाला खोली घेतानाच मुलींचे फोटो दाखविले जातात व मुली पुरविल्या जातात. त्यासाठी वेगळे पैसे आकारले जात नाहीत असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची नांवे -गणेश शर्मा, झुबेर हुसेन, अर्जुनकुमार राहू, मनोज गुप्ता, कुमार बहादूर, अशोक रावत आणि विशाल गौतम अशी आहेत.

Leave a Comment