राजीव गांधी आरोग्य योजनेतही बोगस लाभार्थी?

नागपूर – राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांमध्ये बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळाट झाला आहे का? कालच दुष्काळ पीडितांच्या मदत यादीत मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचेही नाव असल्याचे उघड झाल्यानंतर आता नागपुरात काँग्रेसने थेट सोनिया गांधींच्या समोर बोगस लाभार्थी उभे केल्याचे उघड झाले आहे.

ज्या शकुंतला भगत यांना आरोग्य कार्ड देऊन सोनिया गांधींनी राज्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ केला. त्यांची आर्थिक स्थिती थक्क करणारी आहे. 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेचे पहिले आरोग्य कार्ड शकुंतला भगत यांना दिले.

सोनियांनी गरिबांसाठी आणखी एक चांगली योजना सुरू केल्याच्या आनंदात शकुंतला भगत यांना चक्क मिठीच मारली. सोनियांचे असे प्रेम पाहून समोरची हजारोंची गर्दीही भारावली आणि टाळ्यांचा कळकळाट झाला. नंतर सोनियांनी महाराष्ट्र सरकारची स्तुती करत त्यांचे सरकार गरिबांच्या आरोग्याची काळजी घेत आहे, असा दावाही केला. पण राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजनेचा आठ जिल्ह्यांनंतर राज्यभरात विस्तार करताना, त्यांनी ज्यांची लाभार्थी म्हणून निवड केली, त्या खरोखरच लाभार्थी बनू शकतात का? असा संशय आता येऊ लागला आहे.

Leave a Comment