अभिनेता राजीव खंडेलवाल करणार डिटेक्टीवची भूमिका

छोट्या पडद्याकडून रुपेरी पडद्याकडे वळणारा अभिनेता राजीव खंडेलवाल गेल्या काही दिवसांपासून भलत्याच फार्ममध्ये आहे. आगामी काळात येत असलेल्याा सिनेमात आता अभिनेता राजीव खंडेलवाल हेरागिरी करताना झळकणार आहे. कविता बरजात्याची निर्मिती असलेल्या ‘सम्राट अॅण्ड को’ या सिनेमात तो राजीव डिटेक्टीव्हाची भूमिका करणार आहे.

आगामी काळात येत असलेल्या ‘सम्राट अॅण्ड को’ या सिनेमात राजीवसोबत मदालसा शर्मा ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राजश्री प्रोडक्शन हे कौटुंबिक सिनेमाची निर्मिती करण्यासाठी ओळखले जाते. परंतु, यावेळेस ते पहिल्यांदाच हेरगिरीवर आधारित रहस्यमय सिनेमाची निर्मिती करत आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी १ मे २०१४ला प्रदर्शित होणार आहे. येत्या काळात ‘सम्राट अॅण्ड को’ या सिनेमाचे शुट लवकरच सुरू होणार आहे.

आगामी काळात डिटेक्टीची भूमिका असलेले बरेचसे सिनेमा येत आहेत त्याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे ‘सम्राट अॅण्ड को’ या अरशद वारसीचा ‘मि. जो बी कार्व्हेलो’, रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’, सुशांत सिंगचा डिटेक्ट व ब्योमकेश बक्शी’, विद्या बालनचा ‘बॉबी जासूस’ आणि अनुष्काचा ‘एनएच १० ‘हे हेरगिरीवर आधारित चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित होणार आहेत.