
मुंबई – पाच वर्षांपूर्वी म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती मुंबईत अथवा महाराष्ट्रात होणार नाही अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली आहे. मुंबईसह महाराष्ट्र असल्या दहशतवादी हल्यांपासून पूर्ण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. जर दहशतवाद्यांनी आमच्या राज्यातील नागरिकांना पुन्हा निशाणा बनविण्याचा प्रयत्न केला तर कसाब सारखी त्यांची गत होईल असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.