होंडा सिटीचे नवे मॉडेल – जानेवारीत विक्री सुरू

जपानी कार कंपनी होंडाने भारतातील बाजारात आपले स्थान बळकट करण्यासाठी सोमवारी सिटी कारचे नवे मॉडेल सादर केले असून हे मॉडेल पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध करून दिले आहे.

भारताबरोबरच हे मॉडेल जगातही सादर केले गेले आहे. यापूर्वी होंडासिटी फक्त पेट्रोल व्हर्जनमध्ये होती मात्र आता त्याचे डिझेल मॉडेलही आणले गेले आहे असे कंपनीचे प्रमुख योशियुकी मात्सुमेतो यांनी सांगितले. ते म्हणाले फोर्थ जनरेशनचे हे मॉडेल पूर्णपणे नवीन स्वरूपात सादर केले गेले असून ते जानेवारी २०१४ पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. होंडाची भारतीय बाजारात अमेझ आणि ब्रायेासह पाच मॉडेल्स उपलब्ध आहेत.

Leave a Comment