हैदराबाद – हैदराबाद शहरातली पहिली मेट्रो रेल्वे पुढच्या वर्षी धावण्याची शक्यता आहे. ही मेट्रो रेल्वे कोरियात तयार करण्यात आली असून तिच्या चाचण्या पुढच्या वर्षीच्या मे मध्ये घेतल्या जाणार आहेत. त्या यशस्वी झाल्या तर वर्षाअखेरपर्यंत किंवा ङ्गार तर २०१५ च्या ङ्गेब्रुवारीपर्यंत हैदराबादच्या लोकांना ही सेवा उपलब्ध होईल.
चाचण्यांमध्ये कितीही विलंब झाला तरी २१ मार्च २०१५ रोजी कोणत्याही स्थितीत हैदराबाद मेट्रो रेल्वेच्या नागोले ते मेट्टुगुडा या पहिल्या टप्प्यातील वाहतूक निश्चितपणे सुरू होऊ शकेल, अशी माहिती एल. आणि टी. मेट्रो रेल्वे हैदराबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. बी. गाडगीळ यांनी दिली.
या गाडीचे डबे, इंजिन, स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र, मोबिलीटी कार्ड या सार्या सेवा कोरियातूनच येणार आहेत. या मार्गावर धावणार्या दोन गाड्यांमध्ये जास्तीत जास्त ७२ सेकंदांचे अंतर असेल. परंतु तरीही दोन गाड्यातील अंतर राखले जाईल. त्यासाठी अत्याधुनिक सिग्नलींग यंत्रणा बसवली जाईल. अशा प्रकारची यंत्रणा बसवणारी ही देशातली पहिलीच गाडी असेल. गाडीचा वेग ८० कि.मी. प्रती तास एवढा होऊ शकत असला तरी प्रत्यक्षात गाड्या ४० कि.मी. प्रती तास वेगाने पळवल्या जातील.