मनुका मध जखमेवर गुणकारी

मधाचे अनेक प्रकार आणि उपयोग यावर केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये संशोधन सुरू आहे. कारण मधामध्ये काही चमत्कारिक गुणधर्म आढळले आहेत. मधामुळे चिघळणारी जखम बरी होते. असे बर्‍याच दिवसांपासूनचे निष्कर्ष आहेत. मात्र मधांमध्ये सुध्दा मनुका मध हा मधाचा प्रकार जखमेवर अतिशय प्रभावी आणि गुणकारी ठरलेला आहे. ऑस्ट्रेलियातील युनिर्व्हसिटी ऑङ्ग टेक्नॉलॉजी या सिडने शहरातील संशोधकांनी मधाच्या गुणधर्मावर खूप अभ्यास केलेला आहे. त्यांच्या दृष्टीने मधाचे अनेक प्रकार आहेत परंतु त्यातल्या त्यात मनुका मध, कानुका मध आणि क्लोव्हर मध हे तीन प्रकार अधिक गुणकारी आहेत.

मनुका मध या मधाच्या प्रकाराचा द्राक्षापासून तयार होणार्‍या मणुकांशी काही संबंध नाही. मनुका मध हा मधाचा विशिष्ट प्रकार असून तो न्यूझीलंडमध्ये तो मोठ्या प्रमाणावर सापडतो. मधाचे जे पोळे लेप्टोस्परमम या वनस्पतीवर वाढते. त्या पोळ्यामधून निघणारा मध म्हणजे मनुका मध. हा विशिष्ट मध जखमेवर का गुणकारी आहे याची चिकित्सा केली असता असे आढळले की, त्यामध्ये मेथील ग्लायक्सॉल हे द्रव्य असते आणि ते विपुलतेने असल्यामुळे हा मध जखमेला उपयुक्त ठरतो.

त्यामुळे काही शास्त्रज्ञांनी ग्लायक्सॉल हे द्रव्य कृत्रिमरित्या तयार करून ते नैसर्गिक पण साध्या रसामध्ये मिसळायला सुरूवात केली आणि तोच मध ते मनुका मध म्हणून विकत आहेत. मात्र निसर्गातला मनुका मध आणि कृत्रिम मनुका मध यांची बरोबरी कधीच होऊ शकणार नाही. मनुका मधात ग्लायक्सॉलबरोबरच हैड्रोजन पेरॉक्साइड हेसुध्दा मोठ्या प्रमाणावर असते. ते तसे सर्वच मधांमध्ये थोड्याबहुत प्रमाणात आढळते परंतु मनुका मधात हे हैड्रोजन पेरॉक्साइड ङ्गारच मोठ्या प्रमाणावर आढळते आणि म्हणून हा मध जखम लवकर भरतो.

अमेरिकेतल्या तीन संस्थांमध्ये मनुका मधाबाबत अधिक संशोधन सुरू आहे. त्यामध्ये काही सौंदर्य प्रसाधने तयार करणार्‍या कंपन्याही सहभागी झाल्या आहेत. साधारणपणे जखम बरी करण्यासाठी ऍन्टीबायोटिक वापरले जाते. त्यांची एक मर्यादा असते. एखादे ऍन्टीबायोटिक वारंवार वापरले गेले की त्याचा प्रभाव कमी होतो ज्या जंतुंसाठी म्हणून वापरले जाते त्या जंतुंच्या शरीरामध्ये त्या ऍन्टीबायोटिकला प्रतिकार करतील असे बदल होतात पण मनुका मधाच्या बाबतीत तसे होत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment