तलवार दाम्पत्य दोषी, उद्या सुनावणार शिक्षा

नवी दिल्ली- तब्बल पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरुषी तलवार आणि हेमराज दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला. आरुषीचे आई -वडील राजेश आणि नुपूर तलवार या दोघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. तलवार दाम्पत्याला कलम 302 (खुनाचा गुन्हा), 201 (पुरावे नष्ट करणे), आणि 34 ( कट रचणे) नुसार दोषी ठरवण्यात आलंय.

गाझियाबाद कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली उद्या याबाबत शिक्षेची सुनावणी होणार आहे. गुन्हा निश्चित होताच दोघांनाही रडु कोसळले. आज संध्याकाळी तलवार दाम्पत्याला दासना जेलमध्ये हलवण्यात येणार आहे. मात्र या निर्णयामुळे आपल्याला दुख झालं अशी प्रतिक्रिया तलवार दाम्पत्याने दिली. तसंच या निर्णयाविरोधात अलाहाबाद हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं तलवार दाम्पत्याचे वकील रिबेका जॉन यांनी सांगितले आहे.

16 मे 2008 मध्ये झालेल्या हे हत्याकांड देशभरात गजाला होता. 14 वर्षाची मुलगी आरुषी आणि 45 वर्षाचा नोकर हेमराज यांची 16 मेच्या मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी आरुषीचे वडील राजेश तलवार आणि आई नुपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज तब्बल पाच वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. मारेकरी आऱुषीचे आई वडिल आहेत की नाही हे आज स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment