गुंतवणुकीबाबत भारत पहिला

नवी दिल्ली – भारत सरकारने अधिकाधिक उद्योग क्षेत्रे परकीय गुंतवणुकीस खुली करून गुंतवणुकीवरील निर्बंध कमी केल्यापासून भारतातील गुंतवणुकीला चालना मिळण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या तरी जगामध्ये भारताचा गुंतवणुकीस अनुकूल देश म्हणून अव्वल क्रमांक लागला आहे. या बाबतीत ब्राझीलचा दुसरा तर चीनचा तिसरा क्रमांक आहे. ईवाय या ङ्गर्मने केलेल्या जागतिक पाहणीमध्ये ही गोष्ट आढळून आली आहे.

गुंतवणुकीस अनुकूलता असण्याच्या बाबतीत अमेरिका हा देश सर्वोच्च मानला जात होता आणि जपान तर याबाबतीत ङ्गारच आघाडीवर होते. कोरियाचाही बराच गवगवा होता, परंतु या सर्व देशांना मागे सारून भारत आणि ब्राझील यांनी बरीच मुसंडी मारली आहे. या क्रमवारीमध्ये कॅनडाचा क्रमांक चौथा तर अमेरिकेचा क्रमांक पाचवा आहे.

दक्षिण आङ्ग्रिका, व्हिएतनाम, म्यानमार, मेक्सिको आणि इंडोनेशिया या देशांचे अनुक्रमे सहा ते दहा असे क्रमांक आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने नवी गुंतवणूक नीती जाहीर केली. तेव्हापासून भारताच्या गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता दिसायला लागली आहे. भारतामध्ये अमेरिका, ङ्ग्रान्स आणि जपान या देशांनी गुंतवणुकीमध्ये रस दाखवला आहे आणि या तीन देशांची ही मोठी गुंतवणूक भारतात होण्याची शक्यता आहे.