विराट कोहली ९९ वर बाद होणारा २१ वा खेळाडू

विशाखापट्टणम: विडीज विरुध्दच्या दुस-या वनडे सामन्यात भारताचा युवा फलंदाज शतकापासून केवळ एक धाव दूर राहिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वनडे सामन्यात, विराट ९९ धावांवर असताना होल्डरने त्याचा अप्रतिम झेल टिपला. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये ९९ धावांवर बाद होणारा, कोहली हा जगातील २१ व खेळाडू तर पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

विंडीज विरूध्दच्या सामन्यात कोहलीच्या करियरमधील आठरावे आणि विशाखापट्टणममध्ये सलग तिसरे शतक ठरले असते. रवी रामपॉलच्या चेंडूवर त्याने फाईन लेगला एक फटका खेळला आणि कोहली ९९ धावांवर बाद झाला. यामुळे कोहली वनडे क्रिकेटमध्ये ९९ धावांवर बाद होणारा जगातील २१ फलंदाजांच्या यादीत जाऊन बसला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २००७ मध्ये तब्बल तीन वेळा ९९ धावांवर बाद झाला होता. याशिवाय श्रीलंकेचा सनथ जयसूर्यासुद्धा दोन वेळा ९९ वर बाद झाला.

के. श्रीकांत हे ९९ धावांवर बाद होणारे भारताचे पहिले फलंदाज होते. याशिवाय राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणही एक-एक वेळा ९९ वर बाद झाले आहेत. कोहलीपूर्वी ९९ धावांवर बाद होणारा भारतीय फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर. आठ नोव्हेंबर २००७ रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तेंडुलकर ९९ धावांवर बाद झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध ९९ धावांवर बाद होणारा कोहली हा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण विंडिजविरुद्धच्या नऊ नोव्हेंबर २००२ रोजीच्या नागपूर वनडेत, ९९ धावांवर बाद झाला होता. तर यावर्षी श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशाननंतर कोहली ९९ धावांवर माघारी परतला आहे.

Leave a Comment