हेलेन वादळाने सहा बळी : पिकांचे नुकसान

हैदराबाद – आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागाला हेलेन वादळाचा जबर तडाखा बसला असून १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रातील भाताचे पीक नष्ट झाले आहे. विविध ठिकाणी झालेल्या जलापघातात ६ जण मृत्यूमुखी पडले असून वादळापाठोपाठ आलेल्या मुसळधार पावसानेही लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ङ्गायलीन वादळाला महिनाही झाला नाही तोच या नव्या वादळाने तडाखा दिल्यामुळे पूर्व गोदावरी, कृष्णा, श्रीकाकुलम् आणि पश्‍चिम गोदावरी तसेच गुंटूर या जिल्ह्यातील लोक हतबल झाले आहेत.

आंध्र प्रदेशाचा हा भाग भारताचे तांदळाचे कोठार म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातच हे मोठे नुकसान झाल्यामुळे भारताच्या तांदळाच्या उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तांदळाच्या पिकाबरोबरच २१० हेक्टर जमिनीतील ङ्गळपिकेही उद्ध्वस्त झाली आहेत.

या जिल्ह्यातील १३ लाख हेक्टर क्षेत्रातील तांदळाचे पीक गेल्या महिन्यातल्या मुसळधार पावसाने नष्ट झाले होतेच, त्यात आता ही भर पडली आहे. पावसामुळे ३८१ घरे पडली, त्यात सहा जण मरण पावले. ५६३ गावांचा वीज पुरवठा दोन दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. २१ हजार लोकांना धोकादायक भागातून हलवल्यामुळे मनुष्यहानी कमी झाली. मात्र या लोकांना ९३ पुनर्वसन केंद्रात रहावे लागत आहे.

Leave a Comment