भिकार्‍यांची स्थिती उत्तम : पदव्या घेतलेल्यांची मात्र गंभीर

पुणे – पुण्यात भीक मागणारांची स्थिती नोकरी करणारासारखी होवू लागली आहे तर नोकरी करणासाठी अडचणी दिसू लागल्या आहेत. महागाई प्रचंड वाढल्यामुळे नोकरदाराला संसार चालवणे कठीण झाले आहे. पण पुणे हा भिकार्‍यांचा स्वर्ग झाला आहे. मोठी वाहतूक असणार्‍या चौकात केविलवाणा चेहरा करून भीक मागणार्‍या मुलंाची प्राप्ती महिन्याला सात आठ हजार असल्याची माहिती आल्याने या क्षेत्रात अजून मुले येतील काय, अशी शक्यता वाटू लागली आहे. एमबीए झालेले अनेक तरुण आठ हजाराच्या शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज करतात या पार्श्वभूमीवर व बालकामगार कायद्यानुसार लहान मुलांना अन्य काही काम करणे शक्यच नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुलामध्ये ‘भीक मागणे हा सुरक्षित पर्याय’ अशी भावना आहे काय असे वाटू लागले आहे. मैत्री फौंडेशनच्या पाहणीनुसार बालभिकार्‍यांची माहिती पुढे आली आहे पण एखाद्या शहरातील ‘भिकारी उद्योग’ ही एक संघटीत यंत्रणा असते आणि त्याची उलाढालही मोठी असते, यावर मात्र त्यातून प्रकाश पडलेला नाही.

आपल्याकडे केविलवण्या स्वरात भिक्षा मागणार्‍या मुलांना पाहिलं की, आपोआपच आपण भावुक होतो आणि पैसे देतो. पण आपल्याकडे भिक्षेसाठी भावनिक आळवणी करणार्‍या या बाल भिक्षेकर्‍यांची उलाढाल कोंटीच्या घरात असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे आता भिक मागणे हा उद्योग सध्या तेजीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागातील प्रथम वर्षाच्या मुलांनी मिळून केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. शहरातील 48 चौकांतील बालभिक्षेकरांबाबत हे सर्वेक्षण करण्यात आले. दि. 17 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत या 48 चौकातून 3 ते 14 वयोगटातील 480 मुले भिक मागून दिवसाला 1 लाख 68 हजार रूपये आणि महिन्याला 33 लाख 74 हजार रूपये मिळवतात. पुणे विद्यापीठ, एस.टी.स्टँड, रेल्वे स्टेशन, जुना बाजार चौक, भाजी मंडई, हडपसर, शिवाजी नगर एस.टी स्टँड, स्टेशन परिसर यांसारख्या 48 वेगवेगळ्या ठिकाणी ही मुले शाररिक व्यंग दाखवून, आपल्या लहान भावंडांचा उपयोग करून भीक मागतात.

यातील 80 टक्के मुले महाराष्ट्रातीलच आहेत तर इतर 20 टक्के मुले राजस्थान व बिहारमधून आली आहेत. यापैकी आई वडिल नसणारी 8 टक्के मुले आहेत तर फ्नत आईकिंवा फ्नत वडील असणार्‍यांची संख्या 12 टक्के आहे. 57 टक्के मुले ही 6 ते 10 वर्ष वयोगटातील आहेत. मूल जितके लहान तितकी कमाई जास्त असे गणित या अभ्यासात आढळून आले. या मुलांचे कमीत-कमी शिक्षण तिसरी व जास्तीत जास्त पाचवी असून 91 टक्के मुलांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही. 9 टक्के मुलांनी शाळेची पायरीही चढलेली नाही. 4 कोटीची वार्षिक कमाई मुलांना भीक मागण्याच्या व्यवसायात जाण्यास प्रवृत्त करत असल्याचे आढळून आले आहे.

मंडई, रेल्वेस्थानके, देवळांच्या जवळील जागा, एसटी स्टॅण्ड आणि बागा येथील भिकार्‍यांची मांडणी ही सुव्यवस्थित यंत्रणा असल्याचे पंधरा वर्षापूर्वी पुण्यात झालेल्या पाहणीत स्पष्ट झाले होते पण नव्याने ही पाहणी कोणी केलेली नाही. पूर्वीच्या पाहणीत ‘हा भिकारी उद्योग’ हा संघटित असल्याचे स्पष्ट झाले होते. स्टेशनवरील मोक्याच्या जागेवर भीक मागण्याची मिळवण्यासाठी भिकेतील जवळ जवळ निम्मी रक्कम ठेकेदाराला द्यावी लागते, अशी माहिती यापूर्वी पुढे आली आहे. त्याच बरोबर एका भिकार्‍याची प्राप्ती चतुर्थश्रेणीच्या कर्मचार्‍याइतकी असल्याचे ही यापूर्वी स्पष्ट झाले होते. टिळक महाराष्ट्र व मैत्री संस्था यांच्या पाहणीमुळे वाढत्या शहरीकरणात भिकार्‍यांचा मुद्दा दखल घ्यावी, असा गंभीर ठरण्याची शक्यता आहे. कारण हा फक्त गरीबी व बालरोजगाराशी संंबंधित मुद्दा नसून पुढील काळातील गुन्हेगारीशी यांचा संबंध असण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे समाजकल्याण खात्याकडे याची जबाबदारी येते पण तरीही भिकार्‍यांची संख्या कामय वाढतच असते.
ठळक मुद्दे-
– 80 टक्के बालभिक्षेकरी हे महाराष्ट्रातीलच
– 15 ते 18 वयोगटातील एकही मूल नाही
– जितके मूल लहान, तितकी कमाई जास्त
– बालभिक्षेकर्‍यांमध्ये मुलींची संख्या अधिक
– 91 ट्नके मुलांचे प्राथमिक शिक्षण अपूर्ण

मुलींचे प्रमाण अधिक
या भिक्षेकरी बालकांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण आधिक आहे. मुलांचे 45 तर मुलींचे 55 टक्के प्रमाण आहे. एक मूल दिवसाला कमीत कमी 300 रूपये मिळवते म्हणजेच महिन्याकाठी एका मुलामागे सात ते आठ हजार रुपये कमावले जातात.

Leave a Comment