आम आदमी पार्टीच्या मेळाव्याला तरुणाईचा प्रतिसाद

नवी दिल्ली – आम आदमी पार्टीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून काल जंतरमंतरवर आयोजित करण्यात आलेल्या संगीताच्या कार्यक्रमाला आणि मेळाव्याला हजारो तरुणांनी हजेरी लावून तरुण मतदार आम आदमी पार्टीच्या मागे असल्याचे दाखवून दिले. या मेळाव्यासाठी दिल्ली आणि मुंबईतले अनेक गायक आणि वादक उपस्थित होते.

त्यांनी आयोजित केलेल्या ‘जित की गुंज’ या कार्यक्रमाला तरुण श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यात विशाल दादलानी, सुनीता राव, जसलीन रॉयले, कविता सेठ, आदिती सिंग शर्मा, रणवीर शौरी इत्यादी कलाकार सहभागी झाले होते. अन्यत्र होणार्‍या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी लाखो रुपयांची बिदागी घेणार्‍या या कलाकारांनी आम आदमी पार्टीच्या कार्यक्रमासाठी एकही पैैसा घेतला नाही.

दरम्यान, आम आदमी पार्टीला वादाच्या भोवर्‍यात टाकणार्‍या स्टिंग ऑपरेशनचा खुलासा झाला असून हे बनावट स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी संबंधीत संस्थेने आणि या स्टिंग ऑपरेशनच्या सीडीचे प्रदर्शन करणार्‍या वृत्त वाहिनीने १२ कोटी रुपयांची लाच घेतली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराबद्दल या दोन्ही संस्थांवर आम आदमी पार्टीतर्ङ्गे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

Leave a Comment