अनावश्यक चाचण्या

सध्याच्या वैद्यकीय उपचाराच्या शास्त्रामध्ये रक्त, लघवी यांच्या चाचण्यांना नको एवढे महत्त्व आले आहे. त्याशिवाय रोगनिदान होतच नाही. असे समजले जाते आणि तसा अनुभवही येत असल्यामुळे वरचेवर चाचण्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र आता अमेरिकेतल्या काही डॉक्टरांनी यातल्या बर्‍याच चाचण्या अनावश्यक असतात असे स्पष्टपणे म्हटले आहे. या चाचण्या खर्चिक तर असतातच पण डॉक्टर आपल्याकडे चांगले लक्ष देत आहेत असे रुग्णाला वाटावे यासाठीसुध्दा या चाचण्या घेतल्या जात असतात. भरपूर चाचण्या करायला लावल्या की पेशंटसुध्दा समाधानी होतो. अर्थात हे समाधान ङ्गसवे असते. म्हणून डॉक्टर या चाचण्या अनावश्यक असतात असे तर म्हणत आहेतच पण या चाचण्यांचा शरीरावर दुष्परिणाम होतो असेही इशारे देत आहेत.

अमेरिकेतील २५ नामवंत डॉक्टरांनी अशा अनावश्यक चाचण्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. २०१२ साली त्या देशामध्ये करण्यात आलेल्या आणि रूढ असलेल्या चाचण्यांपैकी ९० चाचण्या अधिक वेळा केल्या गेल्या आहेत आणि त्या नको असताना केल्या गेल्या आहेत. हे या डॉक्टरांनी दाखवून दिले आहे. सध्या ही डॉक्टर मंडळी अनावश्यक चाचण्यांचा आग्रह धरून पेशंटना लुटणार्‍या डॉक्टरांच्या मागे हात धुवून लागले आहेत आणि त्यासाठी त्यांनी च्युजिंग वाइजली ही मोहीम सुरू केली आहे. वारंवार केल्या जाणार्‍या पण अनावश्यक असणार्‍या चाचण्यांच्या यादीमध्ये त्यांनी काही नावेच नमूद केली आहेत.

महिलांना अपत्यप्राप्तीच्या वेळी यातल्या बर्‍याच चाचण्यांना सामोरे जावे लागते. मात्र त्याचे वाईट परिणाम पोटातल्या बाळावर होत असतात. गरोदर महिलांच्या बरोबरच नवजात बालकांनाही दवाखान्यांमध्ये बर्‍याच चाचण्यांना तोंड द्यावे लागते. चटकन डोळ्यांनी पाहून ज्या रोगाचे निदान होऊ शकते आणि साध्या औषधाने जो दुरूस्त होतो त्यालासुध्दा डॉक्टर मंडळी चाचणीचा आग्रह धरतात. ही गोष्ट या ज्येष्ठ डॉक्टरांनी नमूद केली आहे. सध्याच्या काळामध्ये सीटी स्कॅन चाचणी ङ्गार केली जात आहे. परंतु या चाचणीमुळे कर्करोगाची बाधा होण्याची शक्यता असते. या डॉक्टर मंडळींनी या अनावश्यक चाचण्या कशा टाळाव्यात आणि त्यांना पर्याय काय आहेत हेही दाखवून दिलेले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment