स्टारबक जगभरात भारतीय कॉफीचा स्वाद पोहोचविणार

बंगलोर – अमेरिकन कॉफी जायंट स्टारबक ने भारतात उत्पादित केलेल्या कॉफीची विक्री त्यांच्या जगभरातील १९ हजारांवर आऊटलेट मध्ये करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. दक्षिण भारतात बंगलोर येथे पहिले स्टोअर उघडण्यात आले त्यावेळी कंपनीचे चीन व एशिया पॅसिफिकसाठीचे ग्रुप अध्यक्ष जॉन कल्व्हर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की ही कॉफी इंडियन एक्स्प्रेसो या नावाने विकली जाणार आहे.

कल्व्हर म्हणाले की गेल्या वर्षात आम्हाला भारतात उत्तम प्रकारची अरेबियन कॉफी पिकविली जाते याचा शोध लागला. ही कॉफी भाजून व दळून उत्तम स्वादाची भारतीय कॉफी तयार होते. ही कॉफी जगभरात विखुरलेल्या विविध देशातील आमच्या आऊटलेटमध्ये विकली जाणार आहे. भारतात टाटा ग्लोबल ब्रेव्हरीज आणि स्टारबक यांची संयुक्त भागीदारी असून आत्तापर्यंत दिल्ली, मुंबई, पुणे, बंगलोर व कोरामंडल येथे कंपनीची आऊटलेट उघडण्यात आली आहेत. आणखी दोन स्टोअर वर्षअखेर सुरू केली जाणार आहेत. कंपनीची भारतात सध्या ३० आऊटलेट आहेत.

Leave a Comment