पेट्रोल पाईप लाईनच्या स्फोटात चीनमध्ये ३५ ठार

बिजिग – चीनच्या किगदाओ शहरात गुरूवारी कोअॅक पेट्रो कंपनीच्या पाईपलाईनला आग लागल्याने झालेल्या स्फोटात किमान ३५ जण ठार तर १३० जखमी झाले आहेत. कर्मचारी पाईपलाईनीच देखभाल व सफाई करत असताना ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ च्या सुमारास ही आग लागली मात्र अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

पाईपलाईनला आग लागल्यानंतर तेल वहन सकाळपर्यंत थांबविले गेले होते तसेच समुद्रात तेल जाऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायही केले गेले असल्याचे समजते.१७६ किमी लांबीही ही पाईपलाईन हुआंगदाओ येथील सरकारी तेल डेपोत तेलवहन करते. चीन सरकारचा सर्वात मोठा तेल शुद्धिकरण कारखाना येथे आहे.

Leave a Comment