गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ अडचणीत

मुंबई : काही दिवसांपूवी मुंबई एज्युकेशन ट्रस्ट अर्थात एमईटीच्या गैरव्यवहार झालेले प्रकरण पुढे आले होते. या प्रकरणाशी संबध असलयाने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण एमईटीचे माजी विश्वस्त सुनील कर्वे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची सुप्रीम कोर्टाने आता गंभीर दखल घेतली आहे, यावर काय कारवाई करणार हे आठ आठवड्यांच्या आत कळवा असं कोर्टानं मुंबई पोलिस आयुक्तांना बजावले आहे.

राजयाचे सार्वजनिक बांधकाममंत्री भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी एमईटीच्या मालमत्तेचा स्वताच्या फायद्यासाठी वापर केला, तसेच निधीदेखील स्वतासाठी वापरला त्यामुळे एमईटीचे नुकसान झाले असा आरोप त्यांनी केला होता. या सर्व प्रकरणाशी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांचा संबध असलयाचे पुढे आले आहे.

एमईटीच्या इमारतीचा काही भाग भुजबळांच्या खासगी कामासाठी वापरला जात असल्याचाही आरोप कर्वेंनी केला होता. मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार पहिल्यांदा समोर आला होता. त्यामुळे आता यासंदर्भात मुंबई पोलीस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment