एचटीसीचा महागडा हँडसेट भारतात दाखल

स्मार्टफोन मेकर एचटीसीने त्यांच्या उत्पादनातील सर्वात महाग असलेला हँडसेट भारतीय बाजारात आणला असून या एचटीसी वन मॅकसचीं किमत ६१,४९० रूपये इतकी आहे. कंपनीच्या उत्पादनांपैकी हा सर्वात मोठा स्क्रीन असलेला हँडसेट असल्याचे कंपनीचे इंडिया कंट्री हेड फैझर सिद्दिकी यांनी सांगितले.

सध्या या हँडसेटवर ऑफर देण्यात येत असून तो ५६४९० रूपयांना मिळू शकणार आहे. कंपनीने सहा महिन्यांच्या हप्त्यावरही हा हँडसेट विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. यात ग्राहकाला व्याज अथवा प्रोसेसिंग फी भरावी लागणार नाही. ५.९ इंची स्क्रीन असलेल्या या हँडसेटच्या रिअर कॅमेर्‍याखाली स्कॅनर दिला गेला आहे. यामुळे युजरचे फिंगरप्रिंट घेता येतील व हे फिंगरप्रिंट जुळल्याशिवाय फोनचा अॅक्सेस युजरला मिळू शकणार नाही असेही सिद्दीकी यांनी सांगितले.

सध्या हा फोन १६ जीबी व ३२ जीबी स्टोरेज क्षमतेचा आहे मात्र ही क्षमता मायक्रो एसडी वापरून वाढविता येणार आहे. गुगल ड्राइव्हवर ५० जीबी अॅडिशनल स्टोरेज ऑप्शनही ग्राहकांना मोफत दिला जाणार आहे.

Leave a Comment